
सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहातील बांग्लादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता पोलीसांची नजर चुकवून तो फरार झाला. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ठिकठिकाणी सिंधुदुर्ग पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, इन्सुली चेकपोस्ट इथं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.