'तो' बॅनर वेधतोय सगळ्यांचं लक्ष

Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2023 18:44 PM
views 1017  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरणासाठी १९ स्थानकांना १०० कोटी मंजूर झाले असून सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, कणकवली स्थानकांचा यात समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या  पुढाकारान हे काम होत आहे. उद्या सकाळी ११ वा. रेल्वे स्थानक सावंतवाडी येथे याचा भव्य ऑनलाईन उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बॅनर लावत या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून साक्षीदार व्हा असं आवाहन सिंधुदुर्ग भाजपने केल आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांसह राज्य व जिल्ह्यातील नेत्यांचे फोटो आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे मोठे फोटो पहायला मिळत आहेत. सावंतवाडी स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी ६ कोटी २० लक्ष निधी उपलब्ध करून दिल्यान समाधान व्यक्त होत असून याच निमित्तानं रखडलेल्या सावंतावाडी रेल्वे टर्मिनसह एक्सप्रेसला थांब्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी इच्छा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.