
कणकवली : बेंगलोर - कर्नाटक येथील श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणी मंगळवारी बेंगलोर येथेच अटक करण्यात आलेल्या मनु पी. बी. (रा. जिल्हा रामनगर, राज्य कर्नाटक) याला बुधवारी रात्रीच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याला गुरुवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या खून प्रकरणी यापूर्वीच तीन आरोपी अटकेत असून त्यांचीही रवानगी पोलीस कोठडीतच झालेली आहे.










