अबिद नाईकांमुळे आम्हाला दरवर्षी श्रावण महिन्यात घडते देवदर्शन

शिवाजीनगर मधील महिलांनी नाईक यांचे मानले आभार
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 11, 2023 20:50 PM
views 147  views

कणकवली : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आज 11सप्टेंबर श्रावण सोमावर निमित्त कणकवलीतील शिवाजीनगर जळकेवाड़ी व इतर भागातील महिला भगिनीना देवदर्शन घडवले आहे. नाईक यांनी दरवर्षी प्रमाणे कोकणची काशी श्री देव कुणकेश्वर व राजापुर येथील श्री देव धोपेश्वर या देव दर्शनासाठी व्यवस्था केली. अबिद नाईक हे गेली अनेक वर्ष कणकवलीतील महिला भगिनिना श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी निमित्त श्री देव कुणकेश्वर येथे देवदर्शन करण्याची व्यवस्था करत असतात. त्याच प्रमाणे ह्या वर्षी त्यानी देवदर्शनाची महिला भगिनीनची व्यवस्था केली त्याबद्दल सर्व महिला भगिनीनी अबिद नाईक यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर दरवर्षी या देवदर्शनाचे सातत्य राहिल असे अबिद नाईक यांनी आपल्या सर्व महिलाभगिनी यांना आश्वाशीत केले.