
कणकवली : नगरपंचायत निवडणुकीत पालकमंत्री नितेश राणे यांना घेरण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र आलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही व्यूहरचना नितेश राणे कशी भेदणार हे देखील पहावे लागणार आहे. कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाकरे सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, शिंदे सेनेचे माजी आमदार राजन तेली उपनेते संजय आग्रे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे सेनेची व्यूहरचना पालकमंत्री नितेश राणे कशी भेदणार हे आता पहावे लागणार आहे.











