
वैभववाडी : ठाकरे शिवसेना वैभववाडी उपतालुका प्रमुख पदी कुसूर येथील संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.
वैभववाडी ठाकरे शिवसेनेतील तालुका संघटनेत काही पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. तालुका दौऱ्यावर आलेल्या अरुण दुधवडकर यांनी नविन पदाधिकार्यांची नियुक्ती केली. यामध्ये उपतालुकाप्रमुख पदी संतोष पाटील यांची निवड केली. श्री.पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर पक्षाने त्यांच्यावर उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. नियुक्ती झाल्यानंतर श्री पाटील यांचं माजी खासदार विनायक राऊत व अरुण दुधवडकर यांनी अभिनंदन केले.
निवडीनंंतर श्री.पाटील म्हणाले, पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला तो सार्थकी लावणार. तसेच उद्धव ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करीत राहणार आहे. शिवसेना पक्ष पुन्हा तालुक्यात एक नंबरचा पक्ष होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.