
आ.राणे, केसरकरांचं स्वीकारलं नेतृत्व
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह भारतीय जनता पार्टीला शिवसेनेन धक्का दिला आहे. एकीकडे भाजपच सदस्य जोडो अभियान सुरू असताना कुडाळनंतर सावंतवाडीत भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार निलेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाला प्रभावीत होऊन हा पक्षप्रवेश झाला आहे. शिवसेनेचे संघटक संजू परब यांच्या उपस्थितीत कोलगाव मतदार संघातील भाजपसह ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आहे.
हा फक्त ट्रेलर आहे. आमचे नेते आमदार निलेश राणे, माजी मंत्री आम दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. ही लोकशाही असून कोणी कुठे रहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तालुक्यात शिवसेनेत सर्वांना प्रवेश मिळणार आहे. जबरदस्ती कोणावर करणार नाही. जे स्वेच्छेनं येतील त्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाईल अस मत संजू परब यांनी व्यक्त केले. तसेच कोणाच्या दबावाला बळी पडू नका. माझ्यासह शिवसेनेचे नेते निलेश राणे, दीपक केसरकर तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत असा विश्वास त्यांनी दिला. कोलगाव मतदार संघातील भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी लक्ष्मण सावंत, सखाराम करमळकर, निखिल सावंत, शशिकांत करमळकर, किशोर न्हावी, नितीन सावंत, विश्राम न्हावी, योगिता करमळकर, लक्ष्मण वडार, राम वडार, सुरेश वडार, दिलेश जाधव, शोभराज जाधव, विकास जाधव, रवी पवार, विजय चव्हाण, राकेश पवार, ॲड. विवेक टोपले, फिरोज शेख, नारायण निर्घृण, रेश्मा करोल, खयरूनिसा खान, रोशनदी शेख, शाहीन शेख आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी धनुष्य बाण हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.