ठाकरे शिवसेनेचा कणकवलीचा तिढा कायम

अतुल रावराणे, संदेश पारकर की सुशांत नाईक ?
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 21, 2024 13:23 PM
views 642  views

कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघात ठाकरे शिवसेनेचा उमेदवारिचा तिडा कायम असून अजूनही मातोश्रीकडून उमेदवार निश्चितिबाबत परीक्षा घेतली जातं असल्याच खात्रीदायक वृत्त हाती आलं आहे. सकाळी संदेश पारकर यांच्या नावावर उबाठा कडून शिक्कामोर्तब झाल्याची बातमी पुढे आल्या नंतर पुन्हा एकदा नवा ट्विस्ट समोर आला आहे. उबाठाचे सतीश सावंत यांनी स्वतः हुन उमेदवारी बाबत सकारात्मकता दाखवली नसल्याने पक्षश्रेठी नितेश राणेंविरोधात तगडा उमेदवार कोण द्यायचा याबाबत बांधणी करत आहेत. 

दरम्यान विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश पारकर, अतुल रावराणे व सुशांत नाईक हे तिघेजण निवडणूक साठी इच्छुक होते. मात्र या तिघांच्या  बाबतीत मतदार संघात संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांच्या मनातील कल जाणून घेऊन दोन दिवसांनी स्वतः उद्धव ठाकरे उमेदवार जाहीर करणार आहेत. कणकवली मतदार संघातील उबाठाच्या गटातून ही नवीन अपडेट समोर येत आहे. 

नितेश राणे यांना भाजपा कडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असल्याने आता तितक्याच ताकदीचा उमेदवार कणकवली मतदार संघात देण्यासाठी मातोश्री वरून विशेष मोर्चेबांधणी सुरु असून शिवसेना नेते विनायक राऊत, अरुण दुधवडकर, वैभव नाईक यांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे कणकवलीतील उमेदवारीवरून अजून सस्पेन्स कायम आहे.