
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांच्या माध्यमातून उबाठा शिवसेनेला पुन्हा एकदा सुरुंग लावण्यात आला असून उबाठाचे पदाधिकारी सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच सुमन सुदन कवठणकर,ग्रामपंचायत सदस्या विजया कवठणकर , किनळे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश नाईक, श्रद्धा कामटेकर यांच्यासह आरोंदा विभागातील ३०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत तुमचा शिवसेनेत योग्य सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली. संजू परब यांच्या माध्यमातून व सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वात उबाठातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संदेश कवठणकर, सुशील कवठणकर, काशिनाथ राऊळ, श्रीधर राऊत प्रताप म्हालदार ,चेतन म्हालदार, सचिन कवठणकर,नितेश कवठणकर, सुरज कवठणकर,
रुपेश कवठणकर,यशवंत उर्फ यश कवठणकर, महेश बापू कवठणकर, मुन्ना कवठणकर,शेखर कवठणकर,सुनील भगत समीर निवजेकर आदींसह शेकडो शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.