ठाकरे शिवसेनेची मालवण कार्यकारिणीची उद्या बैठक

Edited by:
Published on: March 05, 2025 15:45 PM
views 208  views

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक उद्या गुरुवार दि.०६/०३ /२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण शहरातील लीलांजली हॉल येथे होणार आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कुडाळ विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी या बैठकीस मालवण तालुकयातील सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना पदाधिकारी,शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.