ठाकरे शिवसेनेच्या शहरप्रमुखांचा 'जय महाराष्ट्र'

Edited by: मनोज पवार
Published on: February 27, 2025 20:35 PM
views 204  views

चिपळूण : शिवसेना उबाठा चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा देत अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे शिवसेना उबाठा पक्षात खळबळ उडाली आहे.

 पत्रकार पत्रकारितेतून राजकारणात प्रवेश केलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिपळूण शहर प्रमुख शशिकांत मोदी हे चिपळूण नगर परिषदेत दोन वेळा नगरसेवक आणि आरोग्य सभापती ही होते. 

या काळात त्यांनी विविध उपक्रम राबवून आपल्या करायचा ठसा उमठवीला आहे. शहराच्या विविध भागात त्यांनी काम केले असून आपल्या गोड बोलण्याने त्यांनी शहरवासियांची मने जिंकली आहेत. नागरिकांच्या अडचणीच्या काळात धाऊन जाणे हा त्यांचा स्थायी भाव असल्याने प्रभागातील सर्वांना ते आपलेसे वाटतात. लोकं आपली कोणतीही कामे त्यांना सांगून सोडवून घेतात. लहानापासून ते आबालवृद्धाना  मित्र वाटतात. त्यामुळे ते खरे जनसेवक असल्याने ते कोणत्याही पक्षात गेले तरी आम्ही त्यांच्या सोबत असू असे परशुराम नगर व राधाकृष्ण नगरच्या काही नागरिकांनी सांगितले.