
सिंधुदुर्ग : काजू हमीभावासाठी निघालेल्या जीआरविरोधात ठाकरे पक्षाचं आंदोलन सुरु आहे. हा जीआर फाडून टाकरे गटाने त्याचा निषेध नोंदवलाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आलं होतं.
काजू हमीभावासाठी निघालेला जीआर हा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा आहे. या जीआरमुळे शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. असे सांगत जिल्हाधिकारी भवनाच्या प्रवेशद्वारावर हा जीआर फाडून त्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत, सुशांत नाईक, अतुल रावराणे, संदेश पारकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.