ठाकरे शिवसेना देणार सावंतवाडी पोलीस ठाण्याला धडक

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण
Edited by: विनायक गांवस
Published on: July 10, 2025 16:09 PM
views 75  views

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी- माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी आणि प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठविणाऱ्या सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांना राणे समर्थक धमकी देत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष  उद्या शुक्रवार दि. ११ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये धडक देणार आहे. आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले  भाजप पक्षाचे पदाधिकारी असल्याने भाजप सरकारकडून त्यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे प्रिया चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना लढा देणार आहे. 

यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमख सुशांत नाईक,महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपजिल्हासंघटक शब्बीर मणियार, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डीसोजा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.