वैभववाडीत उद्या ठाकरे शिवसेनेच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 14, 2025 21:10 PM
views 181  views

वैभववाडी : ठाकरे शिवसेनच्यावतीने रविवारी दि.१५जुन रोजी सकाळी ११वा डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तालुक्यातील १०वी १२वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर,राजन तेली, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, अतुल रावराणे, सतिश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर यांनी केले आहे.