सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांची ठाकरे शिवसेने घेतली भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: April 05, 2025 12:29 PM
views 31  views

सावंतवाडी : नगरपरिषदच्या नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी नवनियुक्त मुख्याधिकारी सौ. पाटील यांच्याशी शहरातील विविध समस्यांबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.


 त्यात शहरात होत असलेल्या रस्त्यांबाबत तसेच पाणीटंचाई अनेक शहरातील ठिकाणी होत असलेली दुर्गंधी गटारे व बरेच रस्त्यांच्या खोदाईमुळे पाण्याची फुटत असलेल्या पाईप लाईन अशा सावंतवाडी शहरातील अनेक समस्यांवर मुख्याधिकारी सौ पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यावर योग्यरीत्या कारवाई करत सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार शहर प्रमुख शैलेश गवंडळकर युवा पदाधिकारी आशिष सुभेदार ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख अजित सांगेलकर अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष जावेद शेख रश्मी माळवदे समीरा खलील आदी उपस्थित होते.