ठाकरे शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप...!

Edited by:
Published on: July 04, 2023 20:43 PM
views 125  views

वेंगुर्ले : सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पाचवी ते सातवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे शैक्षणिक वर्षासाठी लागणाऱ्या मोफत वह्या वाटपाचा शुभारंभ वेंगुर्ले शहरातील वेंगुर्ला हायस्कुलमध्ये मंगळवारी तालुका प्रमुख यशवंत परब यांचेसह पदाधिकाऱ्यांचे हस्ते संपन्न झाला.

आपल्या भागातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना व अभ्यासाचा सराव करताना वह्यांची गरज भासते. अनेक पालकांना ते शक्य होत नाही. हि गरज ओळखून उध्दव ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी पक्षीय स्तरावर वेंगुर्ले तालुक्यातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पुरविलेल्या बह्यांचे वाटप सर्व प्रथम वेंगुर्ला हायस्कुलमध्ये होत आहे. या वह्यांचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी वापरावा. असे आवाहन तालुका प्रमुख यशवंत परब यांना वाटप कार्यक्रमांत केले.

यावेळी शहर शिवसेना प्रमुख अजित राऊळ, माजी जिल्हा प्रमुख तुषार सापळे, अँड। जी.जी. टांककर, वजराट विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, महिला आघाडी संघटक उर्मिला निरावडेकर, रश्मी गावडे, कोमल सरमळकर, तसेच पदाधिकारी संदिप केळजी, हेमंत मलबारी, सुनिल वालावलकर, डँलिन डिसोजा, गजानन गोलतकर, दिलीप राणे, अभिनय मांजरेकर, दया खर्डे यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.