राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाकरे शिवसेनेचा धक्का

Edited by:
Published on: November 03, 2024 19:33 PM
views 424  views

कुडाळ : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावीत होऊन माजी.आमदार परशुराम उपरकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. माजी.आमदार परशुराम उपरकर यांनी शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना प्रभाकर चव्हाण म्हणाले आमदार वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्यात दिसून येत आहे.ज्या-ज्या गावात आमदार वैभव नाईक पोहोचतात त्या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात  प्रवेश करत आहेत आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मध्ये महिला बाल रुग्णालय शासकीय मेडिकल कॉलेज अशी अनेका-नेक कामे मार्गी लावले आहेत यामुळेच आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी शहर प्रमुख संतोष शिरसाठ,उपशहर प्रमुख गुरु गडकर, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाठ, शैलेश काळप,अतुल बंगे,अमित राणे,दीपक सावंत,चिन्मय पोईपकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.