
सावंतवाडी : अतिक्रमण विरोधात उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने पाठिंबा जाहीर केला. या उपोषणाला रुपेश राऊळ,बाळा गावडे,आबा सावंत यांनी भेट देऊन पाठिंबा असल्याचे सांगितले. आंबोली पेरीचे भाटले येथे तसेच रायाचे भाटले येथील अतिक्रमण पाडून टाकण्यासाठी फौजदार वाडी,गावठण,रमाईनगर ग्रामस्थानी उपोषण सुरू केले आहे. चौथ्या दिवशी ही उपोषण सुरू आहे. याला शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,बाळा गावडे,आबा सावंत यांनी भेट देऊन भूमीपुत्रांच्या उपोषणाला पाठींबा असून शासनाने दुर्लक्ष केले आहे.
त्यांनी या ठिकाणी जबाबदारीने निर्णय घ्यावा अन्यथा काही घडल्यास पूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल असे सांगितले. यावेळी विभाग प्रमुख बबन गावडे,संतोष पाताडे,प्रकाश गुरव, झिला गावडे,दाजी गुरव,प्रशांत गावडे,दत्ताराम जाधव,मनोहर जाधव, लाडू नाटलेकर,डेमा जाधव,शिवराम गावडे,झिपा सावंत,सरस्वती परब, जिजाबाई सावंत,रोहिणी गुरव,सुनंदा मोहिते,प्रवीण राऊत,अभिजित राऊत,किरण राऊत,रामा राऊत,पांडुरंग गावडे,प्रथमेश गावडे,लिंगराज राऊत,शंकर गावडे,प्रदीप गावडे,अरुण गावडे तसेच महिला वर्ग उपस्थित होते.