मालवणात ठाकरे पक्षाची बैठक

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 30, 2024 17:53 PM
views 233  views

मालवण : मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक ०३ डिसेंबर २०२४ला सकाळी ठीक ११ वाजता मालवण शहरातील लीलांजली हॉल येथे होणार आहे. माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कुडाळ विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

तरी या बैठकीस मालवण तालुकयातील सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना पदाधिकारी, शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी मंगळवारी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.