
वैभववाडी : तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. सध्या भरले जात असलेले खड्डे ताकलादू आहेत.याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून २९ जुलैला रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबातचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
तळेरे-कोल्हापुर मार्ग पुर्णतः खड्डेमय झाला आहे.या महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे यावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.अशीच अवस्था घाटमार्गात झाली आहे.महामार्ग प्राधिकरण विभागाकडून सध्या खड्डूबुजविण्याच काम चुकीचे आहे.केवळ माती,खडी टाकून खड्डे भरून ते राहणार नाहीत.खड्यामध्ये पावसाळी डांबर वापरून ते बुजवावेत.अशी मागणी लोके यांनी केली आहे.संबधित विभागाने हे खड्डे तात्काळ बुजविण्यासाठी शिवसेना ठाकरे रास्तारोको आंदोलन करणार आहे असं श्री लोके यांनी सांगितले.