अरूण दुधवाडकरांनी घेतली पदाधिकाऱ्यांची झाडाझडती !

Edited by: विनायक गावस
Published on: November 21, 2023 19:37 PM
views 556  views

सावंतवाडी : सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज पार पडलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवाडकर यांनी पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. मंत्री दीपक केसरकर यांचे चौथ्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंग करा, त्यांनी जनतेची मतदारांची खोटी आश्वासने देऊन खोट्या घोषणा करून फसवणूक केली. पुन्हा असला गद्दार आमदार नको जनतेच्या दरबारामध्ये त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडा असे आदेश दिले.तब्बल दोन तास बंद दाराआड चाललेल्या बैठकीमध्ये शिवसेना विभाग प्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह युवा सेना तालुका व उपजिल्हा संघटक महिला संघटक यांची स्वतंत्र बैठक भेट घेण्यात आली. 


यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या जानवी सावंत जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा समन्वयक बाळा गावडे,सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब युवासेना जिल्हाप्रमुख सागर नानोस्कर आदीसह सावंतवाडी तालुका आणि वेंगुर्ला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली 

यामध्ये बांदा विभाग अशोक परब संदीप पांढरे माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर राजु शेटकर युवा सेना तालुका संघटक गुणाजी गावडे मायकल डिसोजा उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार संदीप माळकर आबा केरकर आबा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा मतदार संघामध्ये पुन्हा मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपण राहणार असल्याचे घोषित केले आहे या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे या बैठकीमध्ये जिल्हा संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

दीपक केसरकर यांनी केलेल्या अनेक घोषणा फोल ठरल्या, फसव्या ठरल्या केसरकर यांनी एकही विकासात्मक काम अद्यापही मतदारसंघांमध्ये पूर्ण केलेले नाही तरी ते चौथ्यांदा पुन्हा निवडणुक रिंगणात उतरणार आहेत शिंदे गटांमध्ये केसरकर गेले असले तरी त्याचा कोणताही फरक उद्धव ठाकरे शिवसेनेला पडलेला नाही एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत केलेला नाही  त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर जनतेच्या दरबारांत जा आणि केसरकर यांना धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले 


युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी नियोजनार्थ बैठक घेतली यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पक्षांतर्गत कामाचाही आढावा घेतला. सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे 23 नोव्हेंबरला दुपारी सव्वा बारा वाजता खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे त्या बैठकीस युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत दरम्यान गणेश चतुर्थीच्या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे हे कासार यांच्या निवासस्थानी येऊ शकले नव्हते त्यावेळी त्यांनी कासार यांना पुढील दौऱ्यात सर्वप्रथम आपणाकडे येणार असल्याचे आश्वासन दिले होते हे आश्वासन या दौऱ्याने ते पूर्ण करणार आहेत