
वैभववाडी : तालुक्यातील तळेरे-गगनबावडा रस्त्याची दुरवस्था झाली.संपुर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे.सध्या या मार्गावरील खड्डे खडीने बुजविण्याचे काम सुरू आहे. याला शिवसेनेचा विरोध आहे. हे खड्डे पावसाळी डांबराने भरण्यात यावेत अशी मागणी आहे. याकरिता आज रास्तारोको आंदोलन करणार आहेत.