देवगडात राडा ; नितेश राणेंसमोर ठाकरे गट - BJP कार्यकर्ते भिडले

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 09, 2023 19:31 PM
views 1175  views

देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयात राडा झाल्याच पाहायला मिळालं. ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार नितेश राणे यांच्या रुग्ण कल्याण समिती बैठक झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी ग्रामीण रुग्णालय मध्ये असलेल्या दयनीय अवस्थेबाबत आमदार नितेश राणे यांना जाब विचारण्यासाठी आले असता. दोन्ही गट एकमेकांना भिडले.

दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची यावेळी पाहायला मिळाली. शिवसेना - भाजप यावेळी आमने सामने ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नांवरून आमनेसामने येऊन रुग्णालयातील समस्यांवरून राजकारण जोरदार तापले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले व वातावरण तापले होते.