तेंडोली ग्रामस्थांची जिल्हा कृषी कार्यालयाला धडक..!

Edited by:
Published on: November 18, 2023 19:27 PM
views 93  views

कुडाळ : आ. वैभवजी नाईक यांच्या प्रयत्नामुळे अनेक शेतकऱ्यांची फळपीक विम्याची रक्कम दिवाळीत जमा झाली .मात्र अजूनही जिल्ह्यातील अनेक अनेक गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात फळ पिक विम्याचे पैसे जमा न  झाल्यामुळे .जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय विजयजी प्रभू यांच्या नेतृत्वाखाली तेंडोली ग्रामस्थांनी कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन जाब विचारला .जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात फळ पिक विमाचे प्रलंबित पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतली .

 जिल्हा कृषी  अधीक्षक राऊत साहेब यांनी .तातडीने विमा कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवून तुमच्या गलथान कारभारामुळे .शेतकरी आपल्याला वेठीस धरत असून तुमच्या कंपनीवर कारवाई करणार असुन .विमा कंपनीचे महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक प्रमोद पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली .फोनवर चर्चा केली असता नवीन अठरा मंडल तयार झाली असून कृषी आयुक्तालयाच्या पोर्टलवर डाटा अपडेट करण्यात ये काम चालू आहे .यावर विजयजी प्रभू यांनी हरकत घेऊन इतर जिल्ह्याचे काम बाजूला टाकून प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा अन्यथा तुमच्या कर्मचाऱ्यांना आमच्या सोबत गावात नेऊन जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत तुमच्या कर्मचाऱ्यांना सोडणार नाही अशी भूमिका घेतली .यावर विमा कंपनीचे महाराष्ट्र व्यवस्थापक पाटील यांनी लगेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत लवकरच शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी खात्री दिली .

 शेतकऱ्यांच्या फळ पिक विमा चे पैसे केवळ राज्य सरकाराच्या व केंद्र सरकारच्या गलथान  व भोंगळ कारभारामुळे उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जमा होत आहे .जर शेतकऱ्यांच्यात्या फळ पिक विम्याची रक्कम उशिरा मिळत असेल .तर 30 नोव्हेंबरला जो फळ पिक विमा हप्ता आहे. त्याला भरण्याची एक महिन्याची ज्यादा मुदत मिळावी अन्यथा जिल्हाभर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू असा इशारा दिला.

याचबरोबर सुपारी पिकाला विमा संरक्षण मिळावं तसेच धुके पडल्यामुळे मोहर जळून काजू आंबा पिकावर परिणाम होतो याचा पण शेतकऱ्यांना सामना करावा लागतो .यापासून विम्याचे  संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली . यावर सकारत्मक चर्चा करण्या साठी. जिल्हा कृषी अधीक्षक राऊत साहेब यांनी .29 नोव्हेंबरला तातडीची बैठकीचे नियोजनकेले यामध्ये कृषी विभागाचे प्रमुख विमा कंपनीचे प्रमुख कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकरी यांचा समावेश असेल.

विजय जी प्रभू यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाळू पारकर . आकाश मुणनकर .माजी उपसरपंच संजय प्रभू . बंटी पारकर .शशी आरोलकर, ओंकार सामंत, सत्यवान तेंडोलकर. यांचा समावेश होता.