
दोडामार्ग : मोरगाव येथील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री देव म्हताराबाबा देवस्थानचा वर्धापन दिन सोमावर दि. ०५ मे रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी ०८ वाजता श्री देवी माऊली पंचायतन देवतांचे समारंभ स्थळी आगमन, ०९ वाजता अभिषेक,सत्यनारायण महापूजन, दुपारी ०१ वाजता म्हाप्रसाद, सायंकाळी ०४ वाजता स्थानिक भजन, ०६ वाजता देवाजवळ आलेल्या वस्तूची पावणी, ०८ वाजत तांबोळी येथील स्वरधारा भजन मंडळाचे बुवा अमित तांबोळकर यांचा भजनाचा कार्यक्रम, व रात्री १० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा त्रिमुख ब्रम्हांड प्रलय हा नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्य रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मोरगाव देवस्थान कमिटीने केले आहे.