टेंभवली - कालवीसाठी स्नेहा सारंग यांच्याकडून पाण्याची टाकी

Edited by:
Published on: November 28, 2023 19:09 PM
views 141  views

देवगड : देवगड तालुक्यातील टेंभवली कालवी येथील 70 ते 80 कुटुंबीयांना सातत्याने पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबवण्यासाठी कैलासवासी गोविंद सहदेव सारंग यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी स्नेहा गोविंद सारंग यांनी ५ हजार लीटर पाण्याची टाकी देऊन होणारी वणवण थांबवण्यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांचे टेंभवली कालवी येथील ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे. स्नेहा गोविंद सारंग यांच्या हस्ते  याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बबन घाडी, योगेश शिंदे, शरद शिंदे शेखर धुरी ( ग्रा. पं. सदस्य ) सचिन गुरव, अनिल घाडी,अरविंद गुरव,गायकवाड दोन्ही मुली यशश्री व धनश्री आणि नाना सारंग अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.