संदेश पारकरांच्या खात्यात १ कोटी ३० लाख कोणी जमा केले ते सांगावे

निनाद कन्स्ट्रक्शन निनाद विखाळे कडून आलेली ३५ लाखांची रक्कम कशासाठी ? | संदेश पारकरांना मत म्हणजे नितेश राणेंना मत : नवाज खानी
Edited by:
Published on: November 13, 2024 15:59 PM
views 437  views

कणकवली : संदेश पारकर हे खोटे बोलत आहेत. संदेश पारकर यांच्या युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कणकवली च्या खात्यात 1 कोटी 30 लाख जमा झाले होते. ही रक्कम त्यांनी सारस्वत बँकेच्या कर्ज खात्यात भरून कर्जफेड केली आहे. पारकर यांनी ही रक्कम कोठून आली याचा खुलासा पुराव्यासह करावा अन्यथा हा ट्रेलर होता 15 नोव्हेंबर ला पिक्चर दाखवेन असे आव्हान कणकवली विधानसभेचे अपक्ष उमेदवार नवाज खानी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर याना दिले. निनाद कन्स्ट्रक्शन च्या खात्यातून संदेश पारकर यांच्या खात्यात 10 लाख रक्कम जमा झाली आहे.

तसेच निनाद विखाळे यांच्या खात्यातून 25 लाख रक्कम पारकर यांच्या सारस्वत बँक खात्यात जमा झाले आहेत.या रक्कमेबाबत चा खुलासाही संदेश पारकर यांनी आमच्या मुस्लिम बांधव आणि शिवसैनिकांना करणे गरजेचे आहे. समृद्धी पारकर यांच्या बँक खात्यातून निनाद कन्स्ट्रक्शन ही व्यक्ती कोण व त्यांनी पारकर याना मोठी रक्कम का दिली ? याचा खुलासा करावा असे आव्हान नवाज यांनी दिले. पत्रकार परिषदेत नवाज यांनी पारकर यांच्या बँक खात्याचे तपशील सादर केले. संदेश पारकर आणि नितेश राणे हे एकमेकांना सामील आहेत.

संदेश पारकर हे नितेश राणेंचे माणूस आहेत हे यायाधीही मी सांगितले आहे. कुणकेश्वर येथील रापण महोत्सवात संदेश पारकर आणि नीतेश राणे हे एकत्र स्टेजवर होते. नीतेश राणेंच्या स्टेटमेंट मुळे त्याला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे संदेश पारकर हे आमच्या मुस्लिम बांधव आणि समस्त शिसैनिकांची दिशाभूल करत आहेत. मला नीतेश राणेंनी निवडणूकिला उभे केल्याचा ठाकरे सेनेचा दावा आता फोल ठरला असून संदेश पारकर हेच नीतेश राणेंचे मित्र असल्याचे सिद्ध होत आहे.

नीतेश राणेंनी एका चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की नीतेश राणेंनी संदेश पारकर यांचे बँक लोन फेडले. संदेश आणि नीतेश हे चांगले मित्र आहेत आणि मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगितले आहे त्यावरून संदेश पारकर नीतेश राणेंसोबत असल्याचे दिसून येत आहे. 15 नोव्हेंबर च्या आधी संदेश पारकर यांनी 1 कोटी 30 लाखांचे कर्ज नीतेश राणेंच्या मदतीने फेडल्याचा माझा आरोप आहे. तसं नसल्यास आणि पारकर यांच्या म्हणण्यानुसार प्रॉपर्टी विकून कर्जफेड केल्याचे म्हणत असतील तर त्यांनी तसा पुरावा द्यावा अन्यथा हा ट्रेलर आहे पिक्चर 15 नोव्हेंबर ला रिलीज करेन असा इशाराच नवाज यांनी दिला.