सांगावे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर समाजमंदिर काम अर्धवट

ग्रामस्थांनी छेडले उपोषण
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 23, 2023 16:31 PM
views 159  views

कणकवली : कणकवलीत संगावे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर समाज मंदिराचे सन २०१९ ते २०२० या कालावधीमध्ये बांधकाम करण्यात आलेले होते. सदर समाज मंदिर इस्टीमेंटनुसार काम अपूर्ण आहे. सदर कामाची ७० टक्के रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आली आहे. तरी सुद्धा हे काम अपूर्ण स्थितीत आहे. असल्याने ग्रामस्थांनी सांगवी ग्रामपंचायत जवळ केनेडी केनेडी येथे आमरण उपोषण छेडले आहे.

यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, बेनी डिसोजा त्यांनी देखील भेट दिली. त्यावेळी उपोषणकर्त्यांनी या समाज मंदिरला नेमका का विलंब झाला विलंब होणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. उपोषणकर्त्यांनी यासंबंधी गटविकास अधिकारी यांनी येथे येऊन भेट द्यावी अन्यथा आपण आमरण उपोषण चालूच ठेवणार असे सांगितले. 

अर्जुन नामदेव कांबळे, सुनिल रामचंद्र कांबळे, प्रदीप अंकुश कदम, विश्वनाथ रामचंद्र कांबळे,संतोष राघो चव्हाण, भाग्योदय भिकाजी कांबळे, सागर चव्हाण, संदीप वासुदेव तांबे, तुषार शामसुंदर गावकर, कुणाल विजय सावंत उपस्थित होते.







असल्याचे निवेदन सांगावे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कांबळे यांनी कणकवली पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे दिले आहे.


त्यांनी आपल्या निवेदनात ठेकेदारावर तसेच अभियंता यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच यामध्ये समाविष्ठ असलेल्या सरपंच, ग्रामसेवक यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य असून या कामाच्या माहितीसाठी    ग्रामसेवक यांच्याकडे  एमबी ची प्रत मागितली होती पण समाज मंदिराची एमबी ची प्रत न देता शौचालयाच्या एमबी ची प्रत देऊन ग्रामपंचायत सदस्यांचा अपमान केला आहे.त्यामुळे सबब, वरिल सर्वावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसे न केल्यास दिनांक २३/०८/२०२३ रोजी आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा अर्जुन कांबळे यांनी दिला आहे