वाळू माफियांवर तहसीलदारांची धडक कारवाई | होडीसह डंपर केला जप्त

Edited by: विनायक गावस
Published on: September 16, 2023 11:58 AM
views 247  views



सावंतावडी : आरोंदा सावरझुवा येथे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या होडी व डंपरवर सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी धडक कारवाई केली आहे. अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या होडी व डंपरवर ही  कारवाई करण्यात आली आहे.


तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अवैध वाळू उत्खनन करणारी होडी व डंपर ( MH 07 c 6110) जप्त केला आहे. गाडीचा पंचनामा करण्यात आला असून ती ताब्यात घेतली आहे. या होडीत दोन ब्रास तर तीन ब्रास वाळू गाडीत शिल्लक होती. वाळूच अवैध रित्या उत्खनन करणाऱ्यांवर तहसीलदार श्रीधर पाटील, तलाठी आरोंदा प्रविण कोल्हे, तलाठी आंबोली सुमित घाडीगांवकर यांनी धडक कारवाई करत आरोंदा पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, वाळूचा अवैध रित्या उपसा करणाऱ्यांना कारवाईचा इशारा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिला आहे.