बेकायदा कामांची गय नाही | बेकायदा गौण खनिज वाहतुकीवर तहसीलदारांची कारवाई

Edited by: भगवान शेलटे
Published on: June 28, 2024 13:32 PM
views 204  views

सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी पुन्हा एकदा बेकायदा गौण खनिज वाहतुकीवर कारवाई केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर बांदा इथं तपासणी करत असताना दोन बेकायदा गौण खनिज वाहतुक करणारे डंपर आढळले. हे दोन्ही डंपर गोव्याच्या दिशेने जात असताना हि कारवाई करण्यात आली.


या दोन्ही डंपरवर जप्तीची कारवाई करत हे दोन्ही डंपर सावंतवाडी तहसील कार्यालय परिसरात नेण्यात आले. हि कारवाई सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी फिरोज खान, मंडळ अधिकारी उर्मिला गावडे यांच्या पथकाने केली.