तहसिलदार आर जे पवार यांचा वार्षिक कर वसुली उद्दिष्टपूर्ती बद्दल सत्कार

वार्षिक करवसुली 6 कोटी 63 लाख वसुली करत केली 104 टक्के उद्दिष्टपूर्ती
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 12, 2023 16:48 PM
views 123  views

कणकवली : लोकाभिमुख प्रशासन कारभार करत असतानाच प्रशासनाने ठरवून दिलेले वार्षिक कर वसुली चे उद्दिष्ट तब्बल 104 टक्के पूर्ण केल्याबद्दल कणकवली तहसीलदार आर जे पवार यांचा कणकवली तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळ अधिकारी दिलीप पाटील , मंडळ अधिकारी, संतोष नागावकर , मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील,मंडळ अधिकारी विलास चव्हाण, मंडळ अधिकारी नीलिमा प्रभुदेसाई ,अव्वल कारकून एस आर राणे तलाठी श्रीकांत जाधव, तलाठी योजना सापळे , महसूल शाखा सहाय्यक रणजित चौगुले,मनोज आव्हाड, तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशीद सर्व महसूल कर्मचारी सर्व तलाठी, कोतवाल उपस्थित होते. कणकवली तालुक्याला वार्षिक कर वसुली चे उद्दिष्ट 6 कोटी 40 लाख देण्यात आले होते. वार्षिक कर वसुली उद्दिष्ट पार करत तहसीलदार पवार यांनी एकूण 6 कोटी 63 लाख करवसुली करत वार्षिक कर वसुली उद्दिष्ट 104 टक्के पूर्ण केले. या कामगिरीबद्दल कणकवली तहसीलदार दालनात तहसीलदार पवार यांचा आज तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.