SPK तील टेकफेस्टला युवाईचा तुफान प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: February 04, 2025 17:36 PM
views 130  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान विभागाच्यावतीने दोन दिवसीय "टेकफेस्ट 2025" आयोजित करण्यात आल होता. याच्या उद्घाटनासमयी संस्थेचे विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एम ए ठाकूर, आयक्यूएससी समन्वयक बी एन हिरामणी, संगणकशास्त्र विभाग समन्वयक प्राध्यापक योगेश पवार, माहितीतंत्रज्ञान विभाग समन्वयक प्राध्यापक उमेश पवार व संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका विभा गवंडे तसेच माहितीतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापिका स्नेहल नाईक, संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक प्रणाम कांबळी, प्राध्यापक आदित्य वर्दम, प्राध्यापिका तन्वी शिंदे, प्राध्यापक सिद्धिविनायक सावंत, प्राध्यापिका निदा बेग आदी उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणकशास्त्र विभागाच्या कुमारी रिझा शेख व कुमारी दीपिका माळी यांनी केले तसेच आयोजित स्पर्धांची माहिती संगणक शास्त्र विभागप्रमुख प्राध्यापिका विभा गवंडे यांनी दिली. टेक फेस्ट 2025 मध्ये क्विज कॉम्पिटिशन, टाईपोक्लॅप्स, मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, हॅक्टीव्हेट कॅप्चर दि फ्लॅग, रील मेकिंग, बीजीएमआय (स्क्वाड) व दुसऱ्या दिवशी माय एस्क्युल मास्टर माईंड, बीजीएमआय (डियो) आणि टेकवेंचर क्वेस्ट या स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झाल्या.विद्यार्थ्यांची कामगिरी उल्लेखनीय होती या सर्व स्पर्धांमध्ये जवळपास 500 विद्यार्थी सहभागी झाले‌. यामध्ये कणकवली, पणदूर, कुडाळ, बांदा, वेंगुर्ला, शिरोडा व सावंतवाडी मधील विविध महाविद्यालये सहभागी होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे विश्वस्त युवराज लखमराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्व व त्याचा आजच्या युगात होणारा वापर याबद्दल मार्गदर्शन दिले. 


 विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेच्या अध्यक्ष राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोसले, संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत, प्रभारी प्राचार्य आर बी शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यामधे विजेते विद्यार्थ्यांत वेब डेव्हलपमेंट विजेते प्रथम क्रमांक ओमकार राणे (एस पी के कॉलेज सावंतवाडी) द्वितीय क्रमांक ऋतिका गुरव (एस पी के कॉलेज सावंतवाडी)तृतीय क्रमांक अनुज सावंत (एस आर एम कॉलेज कुडाळ) तसेच टेकवेंचर क्वेस्ट विजेते प्रथम क्रमांक सायबर वॉरियर टीम (एस पी के कॉलेज सावंतवाडी),द्वितीय क्रमांक  फ्याब फोर टीम (एस पी के कॉलेज सावंतवाडी), तृतीय क्रमांक टीम आर्या (एस पी के कॉलेज सावंतवाडी), रील मेकिंग विजेते प्रथम क्रमांक मोहन परब (एस आर एम कॉलेज कुडाळ), द्वितीय क्रमांक लक्ष्मण सावंत (एस आर एम कॉलेज कुडाळ), तृतीय क्रमांक निक कांबळे (डी एस गव्हाणकर कॉलेज सावंतवाडी), तर  मोबाईल अॅप डेव्हलपमेंट विजेते प्रथम क्रमांक  आसिया साळगावकर (बीसीए वुमन्स कॉलेज सावंतवाडी) द्वितीय श्रद्धा गवस (एस पी के कॉलेज सावंतवाडी) तृतीय क्रमांक दिपेश गडेकर (एस पी के कॉलेज सावंतवाडी), हॅक्टीव्हेट- कॅप्चर दि फ्लॅग प्रथम क्रमांक गोविंद सावंत (एस पी के कॉलेज सावंतवाडी) द्वितीय क्रमांक रोहित घोगळे (एस पी के कॉलेज सावंतवाडी) तृतीय क्रमांक सोनाली राऊळ (एस पी के कॉलेज सावंतवाडी)  बीजीएमआय (स्क्वाड) प्रथम क्रमांक टीम एनव्ही, द्वितीय क्रमांक टीम जॉब रिपोर्ट, तृतीय क्रमांक टीम सी फॉर एक्स गँग, बीजीएमआय (डुओ) प्रथम क्रमांक रिव्होल्यूशन टीम द्वितीय क्रमांक मराठा इस्पोट टीम तृतीय क्रमांक फ्लॅश टीम व मायएस्क्युअल मास्टरमाइंड विजेते प्रथम क्रमांक  रोहित घाडी (एस आर एम कॉलेज कुडाळ) द्वितीय क्रमांक  कल्पच फणसालकर (एस आर एम कॉलेज कुडाळ) तृतीय कुमारी रक्षिता प्रभू (एस आर एम कॉलेज कुडाळ), क्विज कॉम्पिटिशन विजेते प्रथम क्रमांक  ओंकार राणे व कुमार साहिल गावकर (एस पी के कॉलेज सावंतवाडी) द्वितीय क्रमांक पार्थ सावंत व साक्षी सावंत (एस पी के कॉलेज सावंतवाडी) तृतीय  विराज पारकर व राहुल शिरसाट (कणकवली कॉलेज कणकवली),टाईपोक्लॅप्स विजेते प्रथम क्रमांक  गॅल्विन फर्नांडिस (एस पी के कॉलेज सावंतवाडी) द्वितीय क्रमांक शंकर गव्हाणकर (एस आर एम कॉलेज कुडाळ) तृतीय क्रमांक सिमरन फाले (एस आर एम कॉलेज कुडाळ) ठरले‌. रील मेकिंगचे परीक्षण श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश मर्गज व क्विज कॉम्पिटिशनचे परीक्षण प्राध्यापक प्रसाद ओटवकर व प्राध्यापक सचिन वास्कर यांनी केले. विविध स्पर्धांमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचे सूत्रसंचालन माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कुमारी साक्षी केळुस्कर व कुमारी स्नेहल राणे यांनी केले. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्राध्यापिका निदा बेग यांनी केल.