धरणाचे पाणी ५ गावांना देण्यासाठी टीम गावात...!

Edited by:
Published on: August 16, 2024 10:08 AM
views 475  views

दोडामार्ग : मेढे, पाळये, सोनावल, मोर्ले, केर या ५ तिलारी धरणालगतच्या गावांना पाणी मिळावे ही मागणी नुकत्याच झालेल्या जनता दरबारात मांडली होती त्याला त्याचक्षणी खुद्द पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हिरवा कंदील देत तात्काळ सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने अवघ्या दोनच दिवसात सर्व्हे टीम तिलारीतील त्या पाचही गावात पोहचली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांच्याकडून माहिती घेत गाव परिसर पाहिला. 

याबाबतची माहिती पार्शवभूमी अशी की, तिलारीचे धरणाचे पाणी जवळील ५ गावांना देण्याचा मुद्दा जनता दरबारमध्ये उपस्थित करण्यात आला होता यावेळी  पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ तिलारी जलसंपदा विभागाचे अभियंता विनायक जाधव यांना समोर बोलावून घेत तातडीने सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मंत्री चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चाही झाली. 

यावेळी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, भाजपा उपजिल्हाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, कसई - दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, केर - भेकुर्ली ग्रामपंचायत उपसरपंच तेजस देसाई यांनी या गावात तिलारी धरण आणि परिसरातील पाणी कसे पोहचू शकते याबाबत ढोबळ चर्चा केली. 

यावेळी, खराडी नदीवर मोठा बंधारा बांधणे, गाव ते पाणी द्यावयाचे ठिकाण यांची उंची याबाबत सविस्तर चर्चा झाली असून अधिकारी अनुकूल दिसले असे असले. सर्व्हे अहवाल तातडीने होऊन पालकमंत्री ना. चव्हाण यांना सादर केला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.