
सावंतवाडी : टीम शिवाजी जीम आयोजित सावंतवाडी नगरपरिषद व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने भरविण्यात आलेल्या 'टीम शिवाज क्लासिक २०२५' या शरीरसौष्ठव स्पर्धेचा बांदा येथील संदेश सावंत विजेता ठरला. मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा येथील बॉडी बिल्डरांसाठी ही खुली बॉडी बिल्डिंग स्पर्धा शिवउद्यान येथे आयोजित केली होती. रोमांचक अशा या शरीरसौष्ठव स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत संदेश सावंत विजेता ठरला. तसेच बेस्ट पोझर शुभम तेली व मोस्ट इमप्रृव्ह म्हणून आशिष विचारे यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे अतुल आंब्रे, नितांत कोळी, आशिष वर्तक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, टीम शिवाजीचे शिवाजी जाधव, बॉडी बिल्डर असोसिएशन जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी उप नगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, साईराज जाधव, अमित कदम, डॉ. राजन जाधव, प्रा. सतिश बागवे, सुनंदा जाधव, किशोर सावंत,यश सावंत, साईश परब आदी उपस्थित होते.