शिक्षकांचा निवडणूक प्रशिक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा !

कारण काय ?
Edited by: भरत केसरकर
Published on: April 02, 2024 11:20 AM
views 24  views

कुडाळ : पॅट परीक्षा आणि निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळी आणि एकाच दिवशी सहा एप्रिल ला आयोजित करण्यात आल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या निर्णयाविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. एकीकडे परीक्षा घेता आणि दुसरीकडे प्रशिक्षण लावता मग कसं काम होणार? अशा पद्धतीचा  सवाल उपस्थित करत टोला लगावत बहिष्कारचा थेट इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी यांची भेट घेण्यासाठी आज ४.००वा.शिक्षणाधिकारी कार्यालय येथे  

सर्व संघटना अध्यक्ष, सचिव यांनी उपस्थित राहावे आवाहन मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे यांनी केले आहे. पहिल्यांदा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची भेट या संघटना घेणार आहेत आणि यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि सर्व शिक्षण संघटनाचे पदाधिकारी हे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या संदर्भात लक्ष वेधणार आहेत.          

     एकीकडे निवडणुकीची धामधूम आहे.त्यात वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या आहेत.दरवर्षी निवडणूकीत प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मोठ्या प्रमाणात प निवडणुकीचे काम दिले जाते. मात्र यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळातील माध्यमिक शाळातील शिक्षकांना कंपल्सरी निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. एकीकडे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन शिक्षकांना शिकवण्याशिवाय अन्य काम देण्यात येऊ नये.  याबाबत चर्चा केली होती. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षकांना शाळाबाह्य काम देणार नाहीत अशा प्रकारची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. निवडणूकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र लोकसभेच्या निवडणूक तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना निवडणूकीच्या कामाला वेठीस धरले जात आहे. एप्रिल महिन्यात खरं तर माध्यमिक शाळांच्या वार्षिक परीक्षा होत असतात.अशावेळी एकीकडे परीक्षा सुरू होत आहेत. तर दुसरीकडे या प्रशिक्षणाचे काम. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात माध्यमिक शिक्षण हातबल झाले आहेत. प्रशिक्षणाबरोबर वार्षिक परीक्षेचा निकाल लावणे या कामांमध्ये शिक्षक खरे गुंतलेले असतात. मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी सात मे ला मतदान होत असल्याने या निवडणुकीच्या कामाचे पहिले प्रशिक्षण सहा तारीख ला विविध तालुकास्तरीय ठिकाणी होत आहे. तर या महिन्यांमध्ये अजून दोन-तीन ट्रेनिंग होणार असून सात तारखेला मतदान असल्याने त्याआधी शिक्षकांना कामावर रुजू होण्यासाठी आधीच दोन दिवस बाहेर पडावे लागणार आहे. जनगणना,निवडणूक कामासह अनेक शाळाबाह्य काम शिक्षकांकडून केली जातात. मराठा समाजाच्या जनगणेबरोबर, पडताळणीसाठी अशी  माध्यमिक शिक्षकांना काम दिली गेली.

एकंदर या सगळ्या भूमिकेबाबत माध्यमिक  मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वामध तर्फे, कास्ट्राईब संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आकाश तांबे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, उबाठा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश गोसावी, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अनिल राणे,अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, मराठा संघटनेचे दिनेश महाडगुत, शिक्षकेत्तर संघटनेचे प्रसाद पडते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबैठकीस सोबत माध्यमिक शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत.