
सावंतवाडी : उद्या दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी संपामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सहभागी असून संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही अनेक कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी या संपामध्ये आग्रही मागणी राहणार आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन हा मुद्दा मान्य होत नाही तोपर्यंत पुढील मागण्यांची चर्चाही करायची नाही, असे एकमुखाने ठरवण्यात आले आहे.
१४ मार्चपासून होणाऱ्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी होण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर बंधू - भगिनींनी दिनांक १४ मार्च २०२३ पासून संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उद्याच्या संपात शिक्षक सेना सिंधुदुर्ग सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कमलेश गोसावी यांनी दिली आहे.