नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 05, 2023 19:20 PM
views 129  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे मध्ये 5 सप्टेंबर भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा केला गेला.  परिपाठाच्यावेळी भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच परिपाठात शिक्षक म्हणजेच गुरूंचा सन्मान आणि महत्त्व सांगणारी प्रार्थना सादर करण्यात आली. इयत्ता नववी दहावी तील विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस शालेय कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन केले व स्वतःची भूमिका निश्चित करून त्या प्रकारे काम केले. परिपाठानंतर इयत्ता पहिली ते आठवी तील विद्यार्थ्यांना शिक्षक भूमिका पार पाडून विविध विषयांचे अध्यापन केले.शाळेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. शेवटच्या तासिकेला विद्यार्थ्यांनी आपले दिवसभरातील अनुभव कथन केले. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी संपूर्ण शिक्षक वर्गासाठी शिक्षक दिनानिमित्त अल्पोपहारचे आयोजन केले. संपूर्ण शिक्षक दिनाचे आयोजन इयत्ता नववी दहावीतील विद्यार्थी आणि वर्गशिक्षक ओंकार गाडगीळ आणि शत्रुघ्न कोरे यांनी केले.