
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 22 जुलै रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका शाखा सावंतवाडी तर्फे रक्तदान शिबीर व शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तालुका शाखा कणकवलीने संघटनेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न केले तसेच संस्थापक भा.वा.शिंपी गुरुजी व जॉन दियोग रॉड्रीग्ज गुरुजी यांचे प्रतिमापूजन आणि कातकरी समाज वस्तीतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुका शाखा कुडाळ मार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त शिक्षकांचा शुभेच्छा सोहळा संपन्न झाला.तसेच संस्थापकांच्या प्रतिमापूजन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.तालुका मालवण शाखा तर्फे संस्थापकांच्या प्रतिमपूजन संपन्न केले तर सभासद पाल्यांचा गुण गौरव कार्यक्रम आयोजित केला आहे.
तालुका वैभववाडी शाखेने स्थापना दिन निमित्त रक्तदान शिबिर घेतले. तसेच ग्रामीण रुग्णालय वैभववाडी व उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
तालुका वेंगुर्ला शाखेने प्रतिमा पूजन, सभासद नोंदणी व संपर्क अभियान व वृक्षारोपण असे उपक्रम राबविले.दोडामार्ग तालुका शाखेने प्रतिमा पूजन, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय मधील रुग्णांना फळे वाटप व सभासद नोंदणी उपक्रम पार पाडले. देवगड तालुका शाखेने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न केला.
अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यात शिक्षक समितीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी दिली.