
चिपळूण : परतीचा पडणारा पाऊस आणि चमकणाऱ्या विजा यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच सोमवारी सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडासह परतीच्या पावसामुळे वीज पडून शिक्षिका जखमी झाल्याची घटना अडरे मुकनाक बस थांबा येथे घडली. त्यांना उपचारासाठी मुंबईला हलावण्यात आले आहे. बिना दीपक शिंदे (रा.सती) अशी या शिक्षिकेचे नाव आहे. सौ. शिंदे या जिल्हा परिषद आदर्श शाळा अनारी येथे सेवेत आहेत .सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना पाऊस आणि विजा चमकत असल्याने त्या अडरे मूकनाक बस थांबा येथे थांबल्या. यावेळी जोरदार विजा चमकत होत्या. अचानक त्यांच्या अंगावर वीस पडून त्या भा. तसेच खाली पडल्याने त्यांच्या हातालाही दुखापत झाली.
हा प्रकार लक्षात येताच त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार नंतर पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले. त्यांचे पती दीपक शिंदे हे शिक्षक असून ते कळकवणे शाळेत कार्यरत आहेत. विजा कडकडत असताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी विजा पडून जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यासाठी सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज आहे.