अजित पवारांच्या वक्तव्याचा शिक्षक भारतीकडून निषेध

Edited by:
Published on: December 15, 2023 13:29 PM
views 42  views

सिंधुदुर्ग : अजित पवारांच्च्या पीएचडी बाबतच्या वक्तव्याचे पडसाद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटू लागले आहेत. खरं तर अजित दादा हे एक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे दुर्दैव आहे. त्यामुळे अजित दादांच्या त्या वक्तव्याचा पहिल्यांदा शिक्षक भरतीचा अध्यक्ष या नात्याने मी निषेध करतोय. पुरोगामी महाराष्ट्राला हे न शोभणारे असे वक्तव्य अजितदादांनी केल आहे. पीएचडी केल्याने कोणाचं भलं होतं अशा प्रकारचे वक्तव्य अजित दादांनी केलं होतं. त्या वक्तव्याचा जाहीर निषेध शिक्षक भारतीचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी केला आहे. या वक्तव्या विरोधात शिक्षक भारती आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी याबाबत जोरदार निषेध व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.