टीबी मुक्त भारत ; निबंध स्पर्धेत शमिका भाबल प्रथम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 27, 2025 15:06 PM
views 281  views

देवगड  : 'टीबी मुक्त भारत' या विषयी येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल मध्ये घेण्यात आलेले निबंध स्पर्धेत शमिका संतोष भाबल हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

हंड्रेड डेज क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर इळये व आयुष्मान आरोग्य मंदिर जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमाने जामसंडे येथील  श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल मध्ये हा “ टीबी मुक्त भारत “ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.

सदर स्पर्धेत इयत्ता ९ वी च्या गटात कुमारी : शमिका संतोष भाबल हिने प्रथम क्रमांक पटकावला.तर द्वितीय क्रमांक : कुमारी-आर्या सिद्धार्थ मणचेकर , तृतीय क्रमांक: कुमार - स्वानंद विनोद परब (इयत्ता-९ वी ब ) तर कुमार  : लौकिक सचिन घाडी याने इयत्ता ८ च्या गटात प्रथम तर कुमारी : समीक्षा परेश चव्हाण हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. अर्चना मर्गज, आरोग्य सेविका सुनंदा भोये, आरोग्य सेवक, सतीश महादळकर, मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्या शुभ हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष ॲड.अजितराव गोगटे, सचिव-प्रवीण जोग, शाळा समितीचे अध्यक्ष प्रसाद मोंडकर मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे. आयुष्मान आरोग्य  मंदिर इळये केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनश्री जोईल व आयुष्मान आरोग्य मंदिर जामसंडेचे कर्मचारी यांनी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस दिली. त्याच प्रमाणे स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना संजीवनी जाधव  यांचे मार्गदर्शन लाभले.