तनया वाडकर हिचा राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने सन्मान

Edited by: विनायक गावस
Published on: August 26, 2023 11:30 AM
views 211  views

सावंतवाडी : तनया रामचंद्र वाडकर या सावंतवाडीच्या मुलीने  बी.ए.एलएलबी परिक्षेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या लाॅ काॅलेज पुणे येथून डिस्टिंक्शनसह प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच पाचही वर्ष पहिली येण्याचा बहुमान पटकावला त्याबद्दल सत्कार करण्यात आला.

राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी या मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन तीचा सत्कार करण्यात आला. 

या सत्काराप्रसांगी मंडळाचे सचिव दीपक सावंत, उपाध्यक्ष दिलीप पवार, अरुण घाडी, बंड्या तोरस्कर, महादेव राऊळ, सुरेश भोग,टे प्रदीप नाईक, यशवंत देसाई, उमेश खटावकर, प्रदीप भालेकर, विलास जाधव, संजय पेडणेकर, खलील उदय भराडी मनोज राऊळ सोन्या कासार, संजय साळगावकर  व रवी जाधव उपस्थित होते.