तांबळडेग शिवसेना शाखाप्रमुख पदी महेश येरम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 27, 2024 13:49 PM
views 86  views

देवगड :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तांबळडेग शाखाप्रमुख पदी  महेश येरम यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर केली आहे. युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तांबळडेग येथील ग्रामस्थांशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतले. यावेळी युवा सेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख  सुशांत नाईक,तालुकाप्रमुख मिलिंद साटम,पंचायत समिती माजी सभापती रवींद्र जोगल, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, विभाग प्रमुख श्रीकांत गांवकर, उपविभाग प्रमुख शिवदास नरे, मिठबाव शाखाप्रमुख गणेश जेठे,तांबळडेग माजी ग्रामपंचायत सदस्या संचिता कोंयडे,माजी शाखा प्रमुख आबा तारी,सुनीता कुमठेकर,संजय कोंयडे, मनोज भावे,भाई परब,बाबा बांदकर,संतोष कोंयडे,किरण राजम,आयुष राऊळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.