
सावंतवाडी : तळवणे ग्रामपंचायतीमध्ये गाव विकास पॅनलचा झेंडा घेवुन गोविंद (समीर) शशीकांत केरकर यांची तळवणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसरपंच पदी रामचंद्र अशोक गावडे यांची निवड झाली आहे. यावेळी माजी उपसभापती संदीप नेमळेकर व पंच सदस्य रेषमा टाक्कर परशुराम कांबळी निकीता पालव, सिद्धार्थ मठकर व पंच सदस्य हजर होते.
सरपंचपदी बसल्यानंतर केरकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी तळवणे गावात राहीलेली अपुर्ण कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करीन तळवणे गावातील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करीन. तळवणे गावातील नागरिकानी ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी प्रयत्न करीन, असे ही त्यांनी सांगितले.