एनएमएमएसमध्ये तळवडे विद्यालयाचे यश

Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2025 17:37 PM
views 256  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत  शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत आठवीमधील विद्यार्थी शंभू गणपत पांढरे ह्याने ९५ गुण मिळवून सर्व साधारण प्रवर्गातून  जिल्ह्यात अठ्ठावीसावा क्रमांक पटकावला तसेच कु.गार्गी सचिन कांबळी हिने ८२ गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून जिल्ह्यात चौदावा क्रमांक पटकावला आहे. तसेच कु.भक्ती मिलिंद नाईक  किरण विकास परब कु.मालविका महेंद्र गावडे या विद्यार्थ्यांना सारथीची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.


तसेच सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये विद्यालयातून एकूण पंधरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी पंधराही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या परीक्षेचा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. या परीक्षेत इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. आरोही प्रसाद आडेलकर हिने कांस्यपदक पटकावले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सर्व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी व पर्यवेक्षक दयानंद बांगर यांनी तसेच सर्व संस्था पदाधिकारी, संचालक व सदस्य यांनी तसेच पालक -शिक्षक संघाचे व माता-पालक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.