
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे आंबाडेवाडी येथील आई पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिध्द असणाऱ्या आई पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर आरंभ होईल पूर्वीदेवीला भरजरी वस्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी देवस्थानाच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यत भाविकांची गर्दी होते. रात्री ११ वाजता नवसफेड व लोटांगण त्यानंतर रात्री उशिरा मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुर्वीदेवीचे मानकरी उद्योजक राजाराम गावडे व पुर्वीदेवी भक्तगणांनी केले आहे.