तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरण

तत्कालीन ग्रामसेवक - ठेकेदारांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 13, 2024 14:01 PM
views 871  views

सिंधुदुर्गनगरी :ग्रामपंचायत तळवडेचे तात्कालीन ग्रामविकास अधिकारी नामदेव रामचंद्र तांबे रा. कुडाळ व ठेकेदार सिताराम चंद्रकांत जुवेकर रा. माणगाव यांनी केलेल्या ग्रामनिधीचा सुमारे 73 लाख रकमेचा अपहार केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  गायकवाड यांनी फेटाळला. प्रत्यक्षात कामे न करता कोणतीही प्रशासकीय मंजुरी न मिळवता मोठ मोठ्या रकमा खर्ची घालून वरील आरोपी व अन्य साथीदारानी मिळून ग्रामपंचायत निधीचा अपहार केलेला होता. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.