कुंबळेत तालुकास्तरीय प्लास्टिक संकलन केंद्रांचे उद्घाटन

Edited by: मनोज पवार
Published on: August 16, 2025 11:03 AM
views 42  views

मंडणगड : स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधून पंचायत समिती मंडणगड यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कुंबळे येथे उभ्या करण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्लास्टिक संकलन केंद्रांचे गृहराज्यमंत्री  योगेश कदम यांच्याहस्ते  फित उद्घाटन करण्यात आले. 

पर्यावरणीय बदलाच्या अनुषंगाने कोकणासारख्या इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या संवेदनशील प्रदेशात कमीत कमी प्लास्टिकचा वापर व्हावा आणि वापरात  असलेले प्लास्टिक योग्य पद्धतीने संकलित व्हावे यासाठी हा फार अतिशय  महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. याबद्दल तालुका प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे गृहराज्यमंत्री  योगेश कदम यांनी अभिनंदन केले. 

या कार्यक्रमास शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, दापोली तालुकाप्रमुख उन्मेष राजे, मंडणगड तालुकाप्रमुख  प्रताप घोसाळकर, माजी जि. प. समाजकल्याण सभापती  भगवान घाडगे, सरपंच सौ. ऐश्वर्या धाडवे, दापोली गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, मंडणगड गटविकास अधिकारी  सुनील खरात, कुंबळे गावच्या सरपंच सौ. सानिका पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक ग्रामस्थ इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.