मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान मेळावा

Edited by: विनायक गांवस
Published on: August 13, 2025 17:16 PM
views 26  views

सावंतवाडी : राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर, शिक्षण विभाग सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धा मंगळवारी मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाली यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर,रामचंद्र वालावलकर,केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर,सावंतवाडी तालुका अध्यक्ष ॠषिकेष गावडे, सचिव संजय शेवाळे, बी.आर.सी. प्रतिनिधी स्नेहा गावडे, लतिका सातार्डेकर उपस्थित होत्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर व एस.पी.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल.भारमल यांच्या योग्य व्यवस्थापनातून झालेल्या या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्याच्या शैक्षणिक चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांचा जिल्हा विज्ञान मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.'क्वांटम युगाची सुरुवात: संभाव्यता व आव्हाने' या विषयास अनुसरून झालेल्या या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील माध्यमिक शाळांमधून एकूण २० स्पर्धक सहभागी झाले.सर्व स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर अभ्यासपूर्ण व सखोल सादरीकरण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व चार्ट्स च्या मदतीने प्रभावीपणे केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक यशवंतराव भोंसले स्कूलची अद्विता दळवी, द्वितीय क्रमांक विभव राऊळ मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल  तर सार्थक राऊत आरोंदा हायस्कूल याने तॄतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी केले. सूत्रसंचालन लविना आल्मेडा यांनी तर सावंतवाडी तालुका अध्यक्ष ॠषिकेष गावडे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा.संदीप पाटील,प्रा.प्रशांत काटे, प्रा.सोनाली येजरे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचे तंत्रज्ञ म्हणून अमिना नाईक व दिव्या परीट यांनी काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फरजाना मुल्ला, मिहीर राणे, योगेश चव्हाण, प्रशांत गावकर तसेच सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.