
वैभववाडी : अर्जुन रावराणे विद्यालय येथे ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वैभववाडी तालुका पंचायत समिती गट विकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महविद्यालय वैभववाडी तसेच जयेंद्र रावराणे सेमी इंग्रजी मिडीयम स्कूल वैभववाडी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये 'विज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा असुन विज्ञानाची कास धरून चालल्यास आपली प्रगती आपल्या हातात आहे. विज्ञानामुळे आपले भविष्य उज्वल होईल असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले तसेच विद्यार्थी हा चौकस असावा त्याने आपल्या सभोवतालचा परिसर वैद्यानिक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा हे या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्दिष्ठ आहे असे मत कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी गट शिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे साहेब यांनी व्यक्त केले. तर शालेय जीवनात या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत होत असते असे मत पंचायत समिती वैभववाडीचे गट विकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी व्यक्त केले.
प्रशालेच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर प्रशालेच्या एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. दिपप्रज्वलना नंतर व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षीका स्नेहलता राणे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौरविण्यात आले.
वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थितीत सर्व शिक्षक व विद्यार्थी सर्व संस्था पदाधिकारी यांचे कौतुक देखील केले कार्यक्रम प्रेमी पालक वर्ग आदी मोठया संख्येने उपस्थित होते या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागातून ४२ प्रतिकृती तर माध्यमिक विभागातून १७ प्रतिकृती घेऊन विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चे मुख्य अध्यापक व विषय तज्ञ पंचायत समिती वैभववाडी उपस्थित होते.